पुणे, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील आजारपणाचा नाटक करत असतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ २०२० मधला असून हिंजवडी पोलिस ठाण्यात ललित पाटीलला ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती तेव्हाचा आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात ललितला आणल्यावर त्याने आजारपणाचे नाटक केलं आणि जिन्यावरून उतरून पडल्याचे दाखवत दुसऱ्या दिवशी त्याला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महत्वाचे मुद्दे –
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा डिसेंबर २०२० मधील व्हिडिओ समोर
ललितचं तुरुंगातून रुग्णालयात जाण्यासाठी पडल्याचं नाटक
ललितला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
ललित आणि सचिन वाघला पोलीस कोठडी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.