ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ पुणे पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भूषण पाटीलला पुणे गुन्हे शाखेने उत्तरप्रदेशमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. भूषण पाटील हा उत्तरप्रदेशमधील अयोध्येत लपून बसला होता. पुणे पोलिसांनी भूषणला सापळा रचून बेड्या ठोकल्या.

कोण आहे ललित पाटील ?

चार वर्षांपूर्वी एमडी ड्रग्स प्रकरणात पकडलेला ललित पाटील पुण्याच्या येरवडा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो पुणे पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. नऊ महिन्यांपासून तो उपचाराच्या नावाखाली वारंवार पुणे येथील ससून रुग्णालयात मुक्काम ठोकत असे. तेथून ड्रग्ज रॅकेट चालवत असे. त्याने काही वर्षांपूर्वी उद्धव यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता. सामाजिक कार्यक्रमांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये त्याची ऊठबस होती. समाजमाध्यमांवर अनेकवेळा तो राजकीय नेत्यांसोबतचे फोटो शेअर करत असे. दरम्यान, पोलिसांनी त्याचा पासपोर्ट घरातून ताब्यात घेतला असून, कुटुंबीयांचीही सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version