पुण्यात मुक्तांगण शाळेत लैंगिक शोषण

पुण्यात मुक्तांगण शाळेत लैंगिक शोषण

पुणे, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुक्तांगण शाळेत ७-८ मुलांचे लैगिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शाळेतल्याच काही वरच्या वर्गातील मुलांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा बंद करण्यात आली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. पोलीस, पालक आणि मनसे कार्यकर्ते सर्वजण शाळेच्या आवारात उपस्थित झाले आहेत. याबाबत पोलिसांनी पालकांना शाळेत पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंदणी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता पालक, मनसे कार्यकर्ते यांनी आंदोलन थांबवलं आहे. पर्वती पोलीस अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version