मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांसाठी अकरा पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. या यादीनुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले.
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांसाठी ११ पालकमंत्र्यांची सुधारित यादी
१. पुणे – अजित पवार
२. अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
३. सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
४. अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
५. वर्धा – सुधीर मुनगंटीवार
६. भंडारा – विजयकुमार गावित
७. बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
८. कोल्हापूर – हसन मुश्रीफ
९. गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
१०. बीड – धनंजय मुंडे
११. परभणी – संजय बनसोडे
१२. नंदूरबार – अनिल भा. पाटील
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.