संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदींचा मास्टरस्ट्रोक ?

संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदींचा मास्टरस्ट्रोक ?

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज मंगळवारपासून नव्या इमारतीत सुरू होणार आहे. मंगळवार १९ सप्टेंबर ते शुक्रवार २२ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत विशेष अधिवेशनात आठ विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार नवे महिला आरक्षण विधेयक सादर करणार अशीही चर्चा आहे.

आठ विधेयके

आठ विधेयकांपैकी तीन विधेयके ही आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदींमध्ये बदल करण्याबाबतची आहे. या विधेयकांच्या निमित्ताने मागासवर्गीय आरक्षणावर संसदेच्या नव्या इमारतीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आरक्षणाबाबतच्या विधेयकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशात रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याची चर्चा होत आहे. या शिफारशी लागू झाल्या तर देशाच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version