किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. अवरेंची भर दिवसा चार ते पाच जणांनी गोळ्या घालत निर्घृण हत्या करण्यात आली. याशिवाय कोयत्यानेही वार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाचा हात असून त्यानेच ही हत्या घडून आणल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून ही माहिती मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितले की,
डिसेंबरमध्ये सीओंच्या दालनासमोर एका विषयावरून भानूप्रताख खळदे आणि किशोर आवारे यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे मारलं असा गुन्हा दाखल केला होता. आपल्या वडिलांचा अपमान झाला, सर्वांसमोर वडिलांना मारहाण झाली यावरून गौरवच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यानंतर गौरवने टीम तयार करून हत्या घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. याबाबत अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरून आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडीत लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.