किसान मोर्चाच्या बैठकीला माजी आमदार जिवा पांडू गावित, अशोक ढवळे, अजित नवले उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर गुरुवारी किसान मोर्चा शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची भेट घेणार असून त्याच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर या मोर्चाची पुढील दिशा ठरवली आईल, असे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी सागितले.
मुख्यमंत्र्याच्या बैठकीत अंतिम तोडगा, नाशिकहून मुंबईच्या दिशेने निवालेला शेतक-याचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारवर पूर्णपणे दबाव आणला आहे. राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. किसान मोर्चाच्या शिष्टमंडळसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची गेल्या दोन दिवसापासून होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व सहकारमंत्री अतुल सावे यांनी शहापूर तहसील कार्यालयात किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. ही भेट सुरुवातीला सकारात्मक असल्याचे दादा भुसे तसेच माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी सांगितले. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत आज दुसरी किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
बैठकीत शेतक-यांच्या प्रश्नावर मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक शेतकरी कर्ज कर्जमाफी, शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा, शेतमालाला हमी भाव, यासह वनजमीन, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत संगणक परिचर, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील याना शासकीय कर्मचारी म्हणून प्रलंबित असलेले प्रश्न आणि शासनाच्या वेतनश्रेणीची मलबजावणी या किसान मोर्चाच्या एकूण १४ मागण्या आहेत. सरकारने निम्म्याहून अधिक मागण्या निकाली काढल्याच मंत्री दादा भुसे यानी म्हटल आहे. तसेच ४० टक्के. प्रतिसाद मिळाला. उर्वरित उत्तरांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. वनजमिनीचा मुद्दा फारसा चर्चिला गेला नाही. याबाबत मुख्यमंत्रीच महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे शेतकयांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री आणि उपमुख्याची बैठक घेणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.