महाराष्ट्रद्रोह्यांसोबत चहापान कारायचे नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावर बरं झालं देशद्रोह्यांसोबत चहापानाची वेळ टळली अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेत आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून काढू, अशा शब्दांत पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी चहापानावर बहिष्कार घालणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देशद्रोही असे संबोधले होते. रविवारी खेड येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी शिंदे यांच्या विधानाचा परखड शब्दांत समाचार घेतला होता. त्यांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले असून तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय, अशा आक्रमक शैलीत टीका केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.