महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी हल्ला करण्यात होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही. मात्र या प्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतं आहे.
दरम्यान, हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे आक्रमक पाऊल उचल्याचं दिसून आलं आहे. या हल्ला प्रकरणी ठाण्यातील चिराग नगर येथून दोन जणांना मुंबई पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले.
ही माहिती कळताच ठाण्यातील शेकडो मनसेचे सैनिक आक्रमक झाले. यावेळी मनसैनिकांनी संशयित आरोपींच्या घरी धडक दिली. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. अशोक खरात आणि किशन सोळंकी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यातील अशोक खरात नावाचा आरोपी हा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं समोर आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.