वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

औरंगाबाद : 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण वैद्यकीय शिक्षण घेत असून त्याने एक चिठ्ठी लिहली आहे. या चिठ्ठीत त्याने लिहिलं, ‘माझ्या आत्महत्येस मी जबाबदार आहे. आई बाबा बाय, अशी चिठ्ठी लिहली. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तरुणाला मृत घोषित केले. सागर महेंद्र कुलकर्णी (वय 21 रा.ज्योती प्राइड सातारा परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच हा तरुण लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. लॉकडाऊन लागू झाल्यापासून तो शहरात आला होता. त्याचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सागराला स्किझो फ्रेनिया हा आजार होता. त्याच्यावर बराळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान मंगळवारी सकाळी चहानंतर गोळ्या दिल्या. त्यानंतर चाळीस दिवसांनंतर परीक्षा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी परीक्षेची तयारी करतो असे तो वडिल कामावर जाताना त्यांना बोलला. सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. सागरच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version