1st May Bank Holiday: उद्या महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व बॅंका राहणार बंद, RBI ने सरसकट का दिली सु्ट्टी?

सुट्टीच्या काळात ग्राहकांसाठी यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध राहतील.
1st May Bank Holiday: उद्या महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व बॅंका राहणार बंद,  RBI ने सरसकट का दिली सु्ट्टी?

भारतात 1 मे रोजी कामागार दिवस साजरा केला जातो. या दिवशी बॅंका चालू राहणार की बंद? हा अनेकांना प्रश्न पडला आहे.  तर आता मोठी बातमी समोर आली आहे. उद्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आता बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिनामुळे शुक्रवार, 1 मे 2026 रोजी बँका बंद राहतील. सर्व राज्यांमधील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या सर्व शाखा बंद राहतील. सुट्टीच्या काळात ग्राहकांसाठी यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध राहतील.

1 मे हा दिवस बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन हे एकाच दिवशी आले आहेत.  बुद्ध पौर्णिमा हा भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाणाचा दिवस मानला जातो. कामगारांचे योगदान आणि हक्कांचा सन्मान करण्यासाठी जगभरात कामगार दिन साजरा केला जातो. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो, जो 1960 मध्ये मुंबई राज्याच्या विभाजनानंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

सुट्ट्यांदरम्यान बँकेच्या शाखा बंद राहतील, त्यामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे आणि काढणे शक्य होणार नाही. पासबुक अद्ययावत केले जाणार नाहीत. इतर कामे ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे करता येतील. जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर या सुट्ट्या लक्षात घेऊन आगाऊ नियोजन करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version