राज्यभरात भीमजयंतीचा उत्साह

राज्यभरात भीमजयंतीचा उत्साह

राज्यभरात १४ एप्रिलला साजरा होणाऱ्या १३१ व्या आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर येथे असलेल्या आंबेडकरांच्या समाधीस्थळावर सकाळपासूनच अनुयायांची लगबग सुरु आहे. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनीसुद्धा राज्य शासनाच्यावतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे. चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येत असल्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्यावतीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही अभिवादन करण्यात आले आहे. तसेच आंबेडकरांच्या समाधीस्थळावर चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर नेते आंबेडकरांना अभिवादन करण्यास उपस्थित आहेत. यावेळी आंबेडकरांच्या समाधीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुषवृष्टी केली गेली.

तसेच देशभरातून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून विविध पद्धतीने आंबेडकरांना अभिवादन केले आहे. चित्रकला, वह्या-पुस्तकांतून आंबेडकरांची प्रतिकृती, वाळू शिल्पातून मानवंदना, दगडावर कलाकृती अशा अनेक कलांच्या माध्यमातून आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version