पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात

पुणे: सध्या, पुणे शहरात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. त्यासोबतच, आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील एका परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यतः पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. भारतात बहुसंख्येने येणारे पाकिस्तानी नागरिक हे दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा 90 दिवसांचा असतो.

पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या खालीलप्रमाणे:

दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 35 पुरुष आणि 56 महिला आहेत. तर व्हिजिटर व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 20 आहे.

हेही वाचा: पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांची हकालपट्टी

पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा कायमस्वरूपी बंद:

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे इथून पुढे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी दिला जाणारा व्हिसा कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच, जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतात आहेत, त्यांना देखील भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भारताने अटारी – वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे 2025 पर्यंत अटारी-वाघा बॉर्डर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version