प्रचाराचा शेवटचा दिवस

प्रचाराचा शेवटचा दिवस

बीड, ११ मे २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. शनिवारी, सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे.
शनिवारी, ११ मे रोजी चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारासाठीचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेत्यांच्या बीड मतदार संघामध्ये सभा होणार आहेत. यामध्ये शरद पवार, उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीड शहरातील संभाजीनगर क्रीडांगण या ठिकाणी सभा होणार आहे. तर, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे यांनी बीड जिल्ह्यात तीन सभा आयोजित केल्या आहेत.
सोमवारी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version