निवडणुकीसाठी अमित ठाकरे मैदानात

निवडणुकीसाठी अमित ठाकरे मैदानात

नाशिक, १० मे २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रचार सभा आणि मेळावे होत आहेत. आता मनसे नेता अमित ठाकरेही यात सहभागी होत आहेत.

नाशकात शनिवारी ११ मे रोजी माणसे नेता अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. एकीकडे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचार करत असताना आता अमित ठाकरे देखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजप, शिवसेना राष्ट्रवादीसह मनसेचे सर्व प्रमुख नेते शनिवारी होणाऱ्या मेळाव्याला राहणार उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version