चित्रा वाघ यांचा अभिनेत्री रेणुका शहाणेंना सवाल

चित्रा वाघ यांचा अभिनेत्री रेणुका शहाणेंना सवाल

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यात अलिकडच्या काळात मराठी भाषा वादावरून काही घटना घडल्या. त्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी उमेदवारांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका अशा आशयाची पोस्ट समाज माध्यमातून पोस्ट केली. त्यावर भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहिले आहे. ते पत्र त्यांनी एक्स म्हणजे ट्विटर या समाज माध्यमातून पोस्ट केले आहे.

ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रूपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का..? यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार..? असा सवाल वाघ यांनी पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version