छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी आठ सभांचा धडाका

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी आठ सभांचा धडाका

छत्रपती संभाजीनगर,  ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. मंगळवारी दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण ८  नेत्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि रॅली आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, शिउबाठाचे देसाई, सुषमा अंधारे  आणि वंचितच्या अंजलीताई आंबेडकर, सुजित आंबेडकर यांच्या सभा होणार आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी अनेक नेत्यांच्या सभांचा धडका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सभांमधून नेत्यांकडून एकमेकांवर होणारे आरोप पाहता संभाजीनगरचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version