उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर

उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई काँग्रेस पक्षाचे उमेदवार  भूषण पाटील गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मंगळवारी भूषण पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. गुरूवारी दोन मे रोजी सकाळी ११ वाजता भूषण पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पाटील यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांचे आव्हान असणार आहे. उत्तर मुंबईच्या जागेवर यापूर्वी शिउबाठा गटाकडून दावा करण्यात आला होता. उत्तर मुंबईच्या जागेवर विनोद घोसाळकर यांनी लढण्याची तयारी दाखवली होती. मराठी उमेदवाराला उमेदवारी देण्यावरून उत्तर मुंबई काँग्रेस कार्यकारणीत काहीसा वाद देखील झाला होता. अखेरीस या विरोधाला डावलून काँग्रेस पक्षाने उत्तर मुंबईसाठी भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version