मुंबई, १ मे, २०२४, प्रतिनिधी : महायुतीच्यावतीने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेने महाराष्ट्र दिनाचा योग साधून ठाणे आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून शिवसेनेचेच डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार आहेत.
ठाण्यात नरेश म्हस्के, शिवसेना विरुद्ध राजन विचारे, शिउबाठा अशी लढत होणार आहे. तर कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे, शिउबाठा अशी लढत होईल.
राजन विचारे तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. याआधी २०१४ आणि २०१९ मध्ये ते विजयी झाले आहेत. यामुळे विचारे आणि म्हस्के या लढतीत कोण विजयी होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.
कोण आहेत नरेश म्हस्के ?
२०१२ : ठाणे महापालिकेत नगरसेवकपदी निवड
२०१७ : ठाणे महापालिकेत पुन्हा नगरसेवकपदी निवड
२०१७ : ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड
२०१९ : ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड
कोण आहेत राजन विचारे ?
२००६ – ठाणे महापालिकेचे महापौर
२००९ – आमदार
२०१४ – खासदार
२०१९ – खासदार
कोण आहेत डॉ. श्रीकांत शिंदे ?
२०१४ – खासदार
२०१९ – खासदार
कोण आहेत वैशाली दरेकर राणे ?
२०२४ – कल्याणमधून शिउबाठाच्या लोकसभेच्या उमेदवार
माजी विरोधी पक्ष नेत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.