काँग्रेसची सूरत पाठोपाठ इंदूरमध्ये पंचाईत

काँग्रेसची सूरत पाठोपाठ इंदूरमध्ये पंचाईत

नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ४ जून रोजी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होतील. पण ४ जून आधीच भारतीय जनता पार्टीने गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध विजय मिळवला. विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचा बिनविरोध विजय झाला. यानंतर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काँग्रेसच्या अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आणि भाजपात प्रवेश केला. यामुळे इंदूरमधील भाजपा उमेदवाराचा विजय सोपा झाला आहे. काँग्रेसची सूरत पाठोपाठ इंदूरमध्ये पंचाईत झाली आहे. या दोन्ही जागांवर जाहीर केलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ४ जून आधी काँग्रेसने न लढताच दोन जागा गमावल्या आहेत.

सूरत – मुकेश दलाल, भाजपा (बिनविरोध विजय)
इंदूर – शंकर लालवाणी, भाजपा (विजय झाला सोपा)

सूरत – निलेश कुम्भानी, काँग्रेस (उमेदवारी अर्ज बाद)
इंदूर – अक्षय कांती बम, काँग्रेस (माघार) – माघारीनंतर भाजपात प्रवेश

काँग्रेसची सूरत पाठोपाठ इंदूरमध्ये पंचाईत
सूरतमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय
इंदूरमध्ये मतमोजणीआधीच निकाल स्पष्ट

इंदूरमध्ये काँग्रेसच्या अक्षय कांती बम यांची माघार
बम यांचा भाजपात प्रवेश
भाजपाच्या शंकर लालवाणींच्या विजय झाला सोपा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version