चौथ्या टप्प्यात २९८ उमेदवार रिंगणात

चौथ्या टप्प्यात २९८ उमेदवार रिंगणात

मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३६९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील ७१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार ११, जळगाव १४, रावेर २४, जालना २६, औरंगाबाद ३७, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, शिर्डी २०, बीड ४१ अशी आहे. या ११ मतदारसंघांमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version