सलमानच्या घराबाहेर गोळीबार, दोन पिस्तुलं जप्त

सलमानच्या घराबाहेर गोळीबार, दोन पिस्तुलं जप्त

मुंबई, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवी माहिती आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोळीबार करण्यासाठी वापरलेली दोन पिस्तुलं सूरतमध्ये तापी नदीतून जप्त केली आहेत. नदीतून तीन जीवंत काडतुसे पण जप्त करण्यात आली आहेत. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोघांना अटक केली आहे. पकडलेल्या दोघांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हवेत गोळीबार केला. या नंतर दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी शोधून पकडले. आरोपींनी दिलेल्या माहितीआधारे सूरत येथे तापी नदीतून दोन पिस्तुलं आणि जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट नऊचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वात शोधमोहिम सुरू होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version