सांगली, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघात संजय पाटील, भाजपा विरुद्ध चंद्रहार पाटील, शिउबाठा विरुद्ध प्रकाश शेंडगे, ओबीसी बहुजन विरुद्ध विशाल पाटील, अपक्ष अशी लढत होणार आहे. काँग्रेसमधून बंड करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. यामुळे सांगलीच्या रिंगणात तीन पाटील असतील. या तीन जणांपैकी कोण जिंकणार याचे उत्तर ४ जूनला मतमोजणीतून मिळेल.
सांगलीत ७ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. विशाल पाटील यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. विशाल पाटील यांनी त्यांच्या समाज माध्यमातील खात्यांमधून काँग्रेसचा उल्लेख काढला आहे. यामुळे निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.