सुरत, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सूरत लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. मुकेश दलाल यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज करणाऱ्यांपैकी काँग्रेसच्या नीलेश कुंभार्णी यांचा अर्ज रद्द झाला आहे. तर इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी माघार घेतली आहे. मुकेश दलाल हे भाजपाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या विजयामुळे सूरत लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध विजयाची नोंद झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.