पोलीस टाईम्सपेक्षा न्यूयॉर्क टाईम्समध्ये फोटो झळकणे अभिमानास्पद

पोलीस टाईम्सपेक्षा न्यूयॉर्क टाईम्समध्ये फोटो झळकणे अभिमानास्पद

पुणे, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राशपचे खासदार रोहित पवार यांनी नुकतीच एक ट्विटर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मा. अजितदादा, पवार कुटुंबातल्या सदस्यांचा आदरणीय पवार साहेबांसोबतचा एकत्रित फोटो पाहून तुम्हाला दु:ख होणे स्वाभाविक आहे. यातूनच अमेरिकेच्या वर्तमानपत्रात बातमी येण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप तुम्ही केलात. उलट या फोटोत तुम्हीही असता तर सगळ्यांनाच आनंद झाला असता, परंतु जे केवळ तुमचा वापर करतायेत त्यांना हे नको होतं, असं आमचं ठाम मत असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले, ज्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातही आपल्या कर्तृत्त्वाची छाप उमटवली ते पवार साहेब असले भलते उद्योग का करतील? ….आणि तसंही #मलिदा_गॅंगचे सदस्य बनून ‘पोलीस टाईम्स’मध्ये फोटो येण्यापेक्षा कुटुंबाशी एकनिष्ठा राहून ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये फोटो झळकणं हे अभिमानास्पद नाही का? असं म्हणत रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे अजित पवारांना टोला लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version