मुंबई, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आदित्यला मुख्यमंत्री करून फडणवीस दिल्लीला जाण्यास इच्छुक होते, असा दावा आधी उद्धव यांनी केला. याला उत्तर देताना आदित्यला मंत्री करण्याचा प्रस्ताव नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर आदित्यला मुख्यमंत्री म्हणून तयार करून फडणवीस केंद्रात अर्थमंत्री म्हणून जाण्यास इच्छुक होते, असा नवा दावा उद्धव यांनी केला. उद्धव यांच्या नव्या दाव्याला उत्तर देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून सांगितले.
फडणवीसांनी नेमके काय ट्वीट केले ?
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू.
पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही.
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत.
दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?
महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका.
जशास तसे उत्तर दिले जाईल !
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.