औरंगाबादमधून भुमरेंना उमेदवारी

औरंगाबादमधून भुमरेंना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर (ओरंगाबाद), २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संदिपान भुमरे, शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे, शिउबाठा विरुद्ध, अफसार खान, वंचित विरुद्ध इम्तियाज जलील, एमआयएम अशी लढत होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१९
इम्तियाज जलील, एमआयएम – ३ लाख ८९ हजार ४२ मते – ४४९२ मतांनी विजयी
चंद्रकांत खैरे, शिवसेना – ३ लाख ८४ हजार ५५० मते – पराभूत
हर्षवर्धन जाधव, अपक्ष – २ लाख ८३ हजार ७९८ मते – पराभूत
सुभाष झांबड, काँग्रेस – ९१ हजार ७९० मते – पराभूत

भुमरेंना उमेदवारी, पाटील नाराज

संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढत असलेले विनोद पाटील नाराज झाल्याचे वृत्त येत आहे. दोन आमदार आणि एका राज्यसभेच्या खासदाराने विरोध केला म्हणून मला डावलण्यात आलं असा आरोप विनोद पाटील यांनी केला. लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. लोकांशी संवाद साधणार असेही विनोद पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version