‘रोजगार निर्मिती करणार’

‘रोजगार निर्मिती करणार’

अमरावती, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेत बोलताना नवनीत राणा यांनी अमरावतीच्या युवा पिढीसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. अमरावतीमधील सूतगिरणीचा प्रश्न सोडवणार असेही नवनीत राणा म्हणाल्या. लवकरच अमरावतीमधून ब्रॉडगेज शकुंतला एक्सप्रेस धावेल, असेही आश्वासन नवनीत राणा यांनी दिले. अमरावतीमधील रस्त्यांची कामं लवकर पूर्ण करणार, कापसाची मालवाहतूक रस्ते आणि रेल्वे मार्गाने सुरळीत सुरू राहावी यासाठी आवश्यक ती कामं करणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version