राऊत म्हणजे काँग्रेसचे नाच्या – चित्रा वाघ

राऊत म्हणजे काँग्रेसचे नाच्या – चित्रा वाघ

नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. “विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले” नवनीत राणांवर टीका करताना राऊत यांनी हे शब्द वापरले. यावर चित्रा वाघ यांनी चांगलाच घणाघणात केलाय.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
स्त्रीचा सन्मान करणं हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीत बसून हिंदुत्वद्रोही झालात, तसेच नवनीत राणांसारख्या एका स्त्रीचा अपमान करून महाराष्ट्र धर्मद्रोही झाल्याचाही पुरावा तुम्ही दिलात. त्यांना नाची म्हणून तुम्ही एका मराठी स्त्रीचा पाणउतारा केलात. स्वतः काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन मर्कटनृत्य करणाऱ्याच्या तोंडी अशी विकृत भाषा शोभत नाही. स्वर्गीय बाळासाहेब राजकारणात महिलांचा आदर करायचे. तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करताय. तुमच्या ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या आमच्या भगिनी यशोमती ठाकूर यांची आणि त्यांच्या काँग्रेस पार्टीचीही संस्कृती या निमित्ताने दिसून आली. सभ्यतेचे संकेत पायदळी तुडवून महिलांचा अपमान करणाऱ्या तुमच्यासारख्या शब्दपिसाटांना महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version