मुंबई, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी रत्नागिरी रायगड मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते नाराज आहेत. ‘आमच्यावर ज्यांनी खोट्या केस केल्या त्यांना पाठींबा का ?’ असा सवाल मनसे सैनिकांनी आहे. मनसे सैनिक त्यांची भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे यांची गुरूवारी भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांचा आदेश मानणारा मनसैनिक वैभव खेडेकर देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी राज ठाकरे सोबत होणाऱ्या बैठकीकडे कोकणातील मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.