रणदीप सूरजेवालांवर प्रचारबंदी

रणदीप सूरजेवालांवर प्रचारबंदी

नवी दिल्ली, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह टीप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने रणदीप सूरजेवाला यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी लागू केली आहे. या बंदीमुळे रणदीप सूरजेवाला दोन दिवस प्रचार करू शकणार नाहीत.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १९९९ मध्ये विनोद खन्ना यांच्यासाठी पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा प्रचार केला होता. नंतर २००४ मध्ये हेमा मालिनी यांनी भाजपात प्रवेश केला. हेमा मालिनी २००३ ते २००९ या कार्यकाळासाठी राज्यसभेत खासदार होत्या. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. हेमा मालिनी यांची २०१० आणि २०११ अशी लागोपाठच्या दोन वर्षांसाठी भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी यांना २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने उमेदवारी दिली. दोन्ही वेळा हेमा मालिनी भाजपाच्या तिकिटावर विजयी झाल्या. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा हेमा मालिनींना उमेदवारी मिळाली आहे. यावेळी त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रणदीप सूरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्याविषयी आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. हीच टीप्पणी रणदीप सूरजेवाला यांना भोवली.

रणदीप सूरजेवाला यांचे वादग्रस्त वक्तव्य

‘हमें लोग विधायक, सांसद क्यों बनाते हैं? हम हेमा मालिनी तो हैं नहीं कि चाटने के लिए बनाते हैं।’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version