नवी दिल्ली, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणूक रोख्यांशी संबंधित प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. ते आकडेवारीसह बोलले. देशासाठी घेतलेले निर्णय, राम मंदिर, परराष्ट्र धोरण, रोजगार, परकीय गुंतवणूक, लोकशाही व्यवस्था अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधानांनी मोजक्या शब्दात पण स्पष्ट उत्तरं दिली.
निवडणूक प्रक्रियेतून काळा पैसा बाद व्हावा यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. नोटाबंदी, ऑनलाईन आर्थिक व्यवहार, यूपीआय यानंतर निवडणूक रोखे आणून काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशातील राजकीय पक्षांना प्रामुख्याने तीन हजार कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणगी दिली. यातील सोळा कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर त्यांनी रोखे दिले त्याच सुमारास केंद्रीय संस्थांनी आर्थिक प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या सोळा कंपन्यांकडून भाजपाला ३७ टक्के आणि विरोधकांना ६३ टक्के निवडणूक रोखे मिळाले आहेत. कारवाई झालेल्या कंपन्यांकडून विरोधकांनाच लाभ झाला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काय म्हणाले मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत
देशहितासाठीच निर्णय घेतो – मोदी
विकसित भारत हेच माझं स्वप्न – मोदी
विकसित भारताचे व्हिजन डॉक्युमेंट तयार – मोदी
अजून बरंच काम बाकी – मोदी
माझ्या कामाचा कालावधी काँग्रेसपेक्षा कमीच – मोदी
‘आतापर्यंतचं काम फक्त ट्रेलर, अजून पिक्चर बाकी’
प्रत्येक मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचे – मोदी
२०४७ला विकसित भारत होणार – मोदी
तीन तलाकपासून बहिणींना मुक्त केलं – मोदी
‘गरीबी संपवण्याचं एका नेत्याचं आश्वासन’
पंतप्रधान मोदींची राहुल यांच्यावर टीका
‘गरीबी संपवण्याचं एका नेत्याचं आश्वासन’
‘पाच ते सहा दशकं गरिबी हटवूच शकले नाहीत’
पंतप्रधान मोदींची राहुल यांच्यावर टीका
‘काहींसाठी राम मंदिर हा राजकारणाचा मुद्दा’
राम मंदिर झाल्याने आता राजकारणाचा मुद्दाच संपला – मोदी
‘व्होटबँक काँग्रेसची अपरिहार्यता’
‘त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं’
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसने फक्त मतांचं राजकारण केलं – मोदी
सरकारी खजिन्यातून मंदिराची निर्मिती नाही – मोदी
‘स्थानिक पक्षांना तामिनाडूची जनता कंटाळलीय’
द्रमुकने स्थानिक जनतेची निराशा केली – मोदी
‘द्रमुककडून सनातन धर्मावर टीका’
‘सनातनविरोधात बोलणाऱ्यांसोबत काँग्रेसचं मनोमिलन’
काँग्रेसमध्ये विकृतपणा आलाय – मोदी
परराष्ट्र धोरणात शेजारी देशांना प्राधान्य – मोदी
विश्वासार्हता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कणा – मोदी
तीन हजार कंपन्यांनी दिले निवडणूक रोखे – मोदी
निवडणूक रोखे देणाऱ्या १६ कंपन्यांवर ईडी, सीबीआयची कारवाई – मोदी
कारवाई झालेल्या कंपन्यांकडून भाजपाला ३७ टक्के, विरोधकांना ६३ टक्के पैसा – मोदी
बलाढ्य खासगी कंपन्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न – मोदी
काही बड्या कंपन्या भारतात आल्यात, लवकरच आणखी कंपन्या येणार – मोदी
भारतात मोठी गुंतवणूक आणून रोजगार निर्मिती करण्यावर भर – मोदी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.