विजयवाडा, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी यांच्या विजयवाडातील पथयात्रेवर (रोड शो) दगडफेक झाली. या दगडफेकीत जनगमोहन रेड्डी जखमी झाले. डॉक्टरांनी लगेच जनगमोहन रेड्डी यांच्यावर उपचार केले. आता जनगमोहन रेड्डी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते सुरक्षित आहेत. यात्रा सुरू असताना अज्ञातांनी दगडफेक केली. दगडफेकीत मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी जखमी झाले. मुख्यमंत्री जखमी होताच पोलिसांनी तातडीने त्यांच्याभोवती मोठे सुरक्षा कडे केले. पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दगडफेक प्रकरणी तपास सुरू आहे. जनगमोहन रेड्डी यांच्या समर्थकांनी तेलगु देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.