‘विरोधकांना विकास दिसत नाही’

‘विरोधकांना विकास दिसत नाही’

भिवंडी, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास होत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या मतदारसंघासाठी एमएमआरडीकडून ६५ कोटींचा रस्ता निर्मिती प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाद्वारे रस्त्याची कामं झाली आहेत. मतदारसंघात मूलभूत सेवा पुरवण्यासाठी अनेक कामं झाली आहेत. पण राजकीय विरोधकांच्या डोळ्यांना ही कामं दिसत नसतील तर तो त्यांच्या डोळ्यांचा दोष आहे, त्यांनी चष्मा बदलावा, असे भाजपाच्या तिकिटावर भिवंडीतून लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या कपिल पाटील यांनी सांगितले. याआधी विकास कामं झालीच नसल्याचा आरोप वंचितच्या पाठिंब्याने अपक्ष लढत असलेल्या निलेश सांबरे यांनी केला. या आरोपाला कपिल पाटील यांनी उत्तर दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version