शरद पवारांच्या शेरेबाजीनं सुनेत्रा रडल्या

शरद पवारांच्या शेरेबाजीनं सुनेत्रा रडल्या

पुणे, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘बाहेरच्या पवार’ असा केला. चुलत सासऱ्याने सूनेविषयी केलेल्या वक्तव्याची माहिती मिळाल्यावर सुनेत्रा अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले. अजित पवार यांच्यासोबतच्या लग्नाला प्रदीर्घ काळ झाला. यानंतर चुलत सासऱ्यांनी हे वक्तव्य ऐकावे लागल्यामुळे सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यांनी या विषयावर बोलण्याऐवजी मौन बाळगले.

याआधी बारामतीच्या प्रचार सभेतून अजित पवारांनी लेकीला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या म्हणत सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. मात्र शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना त्या बाहेरच्या असल्याचं म्हटलंय. मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचं पवार म्हणाले. शरद पवारांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले… राज्यभरातून महिलांमध्ये संतापाची लाट उसळली… संतप्त महिलांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे… सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांच्या निशाण्यावर शरद पवार आहेत.

सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. यासाठी त्या सासुरवाशीणीने केलेला त्याग शरद पवारांनी मातीमोल ठरवल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. तर पवार कुटुंबाचा वाद बारामतीकरांवर लादला जात असल्याचे वक्तव्य तृप्ती देसाईंनी केले. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनीही सुनेचा ‘बाहेरच्या पवार’ असा उल्लेख केल्याप्रकरणी शरद पवारांवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version