‘अग्निवीर योजना बंद करणार’

‘अग्निवीर योजना बंद करणार’

भंडारा, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सत्तेत आलो तर अग्निवीर योजना बंद करणार, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोले यांचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधींनी भंडारा जिल्ह्यात सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अग्निवीर योजना बंद करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट ओबीसी असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. सत्तेत आलो तर जातनिहाय जनगणना करणार, अग्निवीर योजना बंद करणार आणि गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देणार अशी आश्वासने राहुल गांधींनी दिली.

मोदींनी समुद्रात द्वारका बुडाली त्या भागात जाऊन श्रीकृष्ण पूजन केले होते. या पूजनाची राहुल गांधींनी खिल्ली उडवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version