मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नका असे भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रवींद्र वायकर यांनी उमेदवारी देण्यावर चर्चा झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा वायकरांविरोधात नकाराचा सूर धरला. महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते. भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली. अमोल कीर्तिकरांविरोधातील प्रचारात भाजपची कोंडी होण्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.