संतापलेल्या महिलांच्या निशाण्यावर शरद पवार

संतापलेल्या महिलांच्या निशाण्यावर शरद पवार

पुणे, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सुनेत्रा अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवारांनी त्यांचा उल्लेख ‘बाहेरच्या पवार’ असा केला. या वक्तव्यावरून महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांच्या निशाण्यावर शरद पवार आहेत.

सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. यासाठी त्या सासुरवाशीणीने केलेला त्याग शरद पवारांनी मातीमोल ठरवल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. तर पवार कुटुंबाचा वाद बारामतीकरांवर लादला जात असल्याचे वक्तव्य तृप्ती देसाईंनी केले. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनीही सुनेचा ‘बाहेरच्या पवार’ असा उल्लेख केल्याप्रकरणी शरद पवारांवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version