संजय मंडलिकांच्या वक्तव्याने वाद पेटला

संजय मंडलिकांच्या वक्तव्याने वाद पेटला

मुंबई, प्रतिनिधी, दि. १२ एप्रिल २०२४ : छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे संजय मंडलिक शाहू महाराजांचे विरोधक आहेत. प्रचार सभेत मंडलिक यांनी शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत. त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं, असं मंडलिक म्हणाले होते. मात्र आता मंडलिकांनी त्यांच्या वाक्यात बदल केला आहे.

आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता याच प्रकरणावर बोलताना संजय मंडलिक यांनी ‘शाहू महाराजांचा अपमान केला नाही, माफी मागणार नाही. खरे वारसदार नाहीत असं चुकून म्हणालो, थेट वारसदार नाहीत असं म्हणायचं होतं’, असं म्हणत आता भूमिका बदलली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version