नवरा बायकोच्या भांडणात अंधारे

नवरा बायकोच्या भांडणात अंधारे

वर्धा, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंच तापलं आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सून पूजा तडस यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुने विरोधात सासरा अशी लढत होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेऊन तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा तडस यांच्या या आरोपांनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

रामदास तडस यांच्या सूनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तडस कुटुंबीयांनी माझा प्रचंड मानसिक छळ केला आहे, माझ्या बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी देखील ते करतात असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे. तर दुसरीकडे पूजा यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मला हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय, पूजा आणि माझ्या सहा केसेस कोर्टात आहेत, असं पंकज तडस म्हणाले. सर्वात आधी पूजा तडस यांनी काय आरोप केलेत आणि कशाप्रकारे पंकज तडस यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

पूजा तडस यांचे आरोप

मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी लग्न
उपभोगण्याची वस्तू म्हणून वापर केला
बाळाची डीएनए चाचणीसाठी दबाव
राहत्याघरून बाहेर काढण्यात आले
रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं
बाळाचा बाप कोण ?, असं म्हणत मानसिक छळ केला.
डीएनएसाठी तयार, न्यायालयाच्या निर्देश मान्य

काय आहे प्रकरण ?

पंकज तडस यांच्यावर पूजा यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले.
लग्नाचे आमिष देऊन फसवणुकीची पूजा यांनी तक्रार केली.
पंकज आणि पूजा यांचं २०२०ला लग्न झाले.
दोघेही वेगळ्या घरात राहू लागले.
मारझोड करून घरातून काढले, पूजा यांचा आरोप.

काय म्हणाले रामदास तडस ?

पूजा आणि पंकजचं २०२०मध्ये लग्न झालं.
आमच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हतं.
दोघेही वर्ध्यात वेगळ्या घरात राहू लागले.
काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी घेतले, फसवणुकीचा कट रचला
सासऱ्याकडे पैशांची मागणीसाठी भाग पाडले.
या संवादाची ऑडिओ पंकजच्या हाती लागली, दोघांमध्ये वाद वाढले.
त्यानंतर पंकज देवळीला राहायला आला.
देवळीला पंकजचे दुकान आहे. दुकानाच्या वर तो राहतो.
पंकजचा न्यायालयात खटला सुरु आहे.

प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयाने या विषयावर बाहेर बोलण्यास मनाई केली आहे. पण या निर्देशांचे उल्लंघन करत पूजा तडस यांनी माध्यमांसमोर बोलत तडस कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले.

खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हा अर्ज अद्याप परत घेतला गेला नाही. सुनेचे पुजा पंकज तडस (शेंदरे)असे नाव असून अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणूनच या राजकीय लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते. आज घडीला या मतदारसंघात नेहमीच्या राजकीय लढाई व्यतिरिक्त सासऱ्याविरुद्ध सून अशी लढत देखील रंगणार असल्याचे चित्र आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version