नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारतीय राज्यघटना सुरक्षित आहे. पण विरोधक राज्यघटना संकटात असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. घराणेशाहीमुळे राज्यघटनेला धोका आहे. विरोधक देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्नात आहेत. आमचे प्राधान्य विकास करण्यावर आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान करून मतदार खासदार निवडणार नाहीत तर देशाचा पाया एक हजार वर्षांसाठी मजबूत करणार आहेत. मागील दहा वर्षात अनेक विकासकामं झाली. ही कामं म्हणजे सुरुवात आहे… अद्याप मुख्य कामाला सुरुवात व्हायची आहे… असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपवले
आंबेडकरांनी केलेली राज्यघटना काँग्रेसने संपूर्ण देशात लागू होऊ दिली नाही
काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून तिथे विघटनाची बीजे पेरण्यात आली
मोदी सरकारने कलम ३७० हटवले, संपूर्ण देशात राज्यघटना लागू केली
जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना सर्व घटनात्मक अधिकार मिळवून दिले,
मोदी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला
घराणेशाहीने राज्यघटनेचा अपमान
मोदी सरकारने मागासवर्गीयांना आरक्षणाचे जास्तीत जास्त लाभ मिळवून दिले
देशात मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा आदिवासी राष्ट्रपती
गेल्या १० वर्षात आदिवासी कल्याण बजेट ५ पटींनी वाढले
विकास झाला, विकासाची गती वाढली
विरोधकांनी रखडवलेले अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले
विदर्भाचा विकास झाला
सीएएनुसार नागरिकता मिळेल ही मोदींची गॅरेंटी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.