बीड, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभेमध्ये आता तिरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचे अशोक हिंगे पाटील म्हटले आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये बीडचा काहीही विकास झालेला नाही निवडणुका आल्या की फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि मत मिळवली जातात असं म्हणत त्यांनी मुंडे भगिनींवर निशाणा साधला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.