मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांच्या राशपात असलेले एकनाथ खडसे लवकरच भाजपात परततील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. खडसेंनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत जाऊन भाजपाच्या निवडक नेत्यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यामुळेच एकनाथ खडसे भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही एकनाथ खडसे लवकरच भाजपात परतणार, असा विश्वास व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.