फडणवीसांच्या समोरच तक्रारींचा पाढा

फडणवीसांच्या समोरच तक्रारींचा पाढा

इंदापूर, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : इंदापूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना अंकिता पाटील ठाकरे यांनी फडणवीसांच्या समोरच तक्रारींचा पाढा वाचला. दत्ता भरणेंविरोधात त्यांनी सभेतून बोलताना नाराजी जाहीर केली. तालुक्यातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी केली. इंदापूर हा एक सुसंस्कृत तालुका आहे. पण वाढत्या भ्रष्टाचारामुळे तालुक्याची प्रतिमा मलीन झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने आवश्यक ते उपा करावे, अशी मागणी अंकिता पाटील ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. इंदापुरात कोणावरही अन्याय होणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version