गव्हाणकरांच्या बंडाने धोत्रेंना फटका बसणार ?

गव्हाणकरांच्या बंडाने धोत्रेंना फटका बसणार ?

अकोला, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाने अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या नारायण गव्हाणकर यांनी बंड करून उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे अकोल्यात अनुप धोत्रे, भाजपा विरुद्ध अभय पाटील, काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर, वंचित विरुद्ध नारायण गव्हाणकर, भाजपाचे बंडखोर अशी लढत होण्याची शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवार ५ एप्रिल रोजी होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची मुदत ८ एप्रिल पर्यंत आहे. यामुळे निवडणूक रिंगणात कोण राहणार याचे चित्र ८ एप्रिल नंतर स्पष्ट होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version