अमरावती, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आता अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित अशी लढत होणार आहे.
नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना नवनीत राणा गहिवरल्या. माझ्या विरोधात चुकीचे बोलले गेले… खालच्या पातळीपर्यंतची वक्तव्ये केली गेली… महिलेला डावलण्याचा प्रयत्न झाला… पण मी केलेला संघर्ष आणि मेहनत यांना यश मिळाले आहे… सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले यामुळे माझी बाजू सत्याची असल्याचे स्पष्ट झाल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जे जात प्रमाणपत्रावरून बोलत होते त्यांची तोंडं बंद झाल्याचे भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.