नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

अमरावती, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माझे राजकारण जनतेसाठी आहे…. स्वतःचे घर भरण्यासाठी नाही… काही जण स्वतःची मालमत्ता वाढवण्याकरिता राजकारण करतात… माझा बाप काढतात… माझ्या वडिलांनी सीमेवर कर्तव्य बजावले… मागे ३३ महिन्यांचे सरकार असताना हनुमान चालीसा म्हटली म्हणून १४ दिवस तुरुंगात टाकले… हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना शोभते का ? असा प्रश्न उपस्थित करत नाव न घेता नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. माझ्यासारख्या लहान व्यक्तीला जेलमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही… पण पाच वेळा ज्यांनी लोकसभेत मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांना उमेदवार म्हणून उभे केले नाही… असे सांगत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version