शिवसेनेनं भाकरी फिरवली

शिवसेनेनं भाकरी फिरवली

मुंबई, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेनं भाकरी फिरवली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आधी जाहीर केलेली हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम यांना तिकीट देण्यात आले. तर यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भावना गवळी आणि संजय राठोड हे दोघे प्रयत्न करत होते. पण गवळी आणि राठोड यांचा पत्ता कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पत्नीला उमेदवारी देत हेमंत पाटील यांची समजूत काढण्यात आली आहे. राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात आहे. हा मुद्दा पण उमेदवारी देताना विचारात घेण्यात आल्याचे समजते.

अशा होणार लढती

यवतमाळ – वाशिम – राजश्री पाटील, शिवसेना विरुद्ध संजय देशमुख, शिउबाठा विरुद्ध खेमसिंग पवार, वंचित विरुद्ध प्रशांत बोडखे

हिंगोली – बाबुराव कदम, शिवसेना विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर, डॉ. बी. डी. चव्हाण, वंचित विरुद्ध शिउबाठा विरुद्ध अॅड. रवी शिंदे, ओबीसी बहुजन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version