लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस ‘नॉकआऊट’

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस ‘नॉकआऊट’

नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरने बुधवारी भाजपात प्रवेश केला. विजेंदरने काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर विजेंदरने २०१९ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. त्याने २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

विजेंदरने २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये आणि राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकले होते. तो राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाला होता. हेमा मालिनी यांच्या विरोधात विजेंदरला मथुरेतून काँग्रेस उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू होती. पण त्याच्या भाजपातील प्रवेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस ‘नॉकआऊट’
बॉक्सर विजेंदरची भाजपाला साथ
विजेंदरने सोडला काँग्रेसचा हात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version