शिउबाठा जिल्हाध्यक्षांचा हेमंत गोडसेंबाबत गौप्यस्फोट

शिउबाठा जिल्हाध्यक्षांचा हेमंत गोडसेंबाबत गौप्यस्फोट

नाशिक, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात काम करणारे खासदार  हेमंत गोडसे यांना महायुतीकडून तिकीट मिळत नसल्याने ते पुन्हा शिउबाठा गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट  शिउबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.  सिन्नरमध्ये शिउबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार मेळाव्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला.  शिउबाठाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बडगुजर यांनी  गौप्यस्फोट नाही तर सत्यता सांगितली अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

बडगुजर पुढे म्हणाले, सत्यतेवर जास्त भर असते. पाहिजेल तर CCTV फुटेज देतो. तसेच हेमंत गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे  आणि त्यांचे मित्र तीन लोक मला भेटले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून हेमंत गोडसे शिउबाठाच्या वाटेवर असल्याचा एकप्रकारे दावाच त्यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version